
सामना प्रतिनिधी। डोंबिवली
स्विमिंगचा सूर आणि बॉडीबिल्डिंगचा नूर लोकसभा निवडणुकीच्या कचाटय़ात अडकला आहे. येथील क्रीडा संकुलातील तरणतलाव आणि व्यायामशाळा तत्काळ बंद कराव्यात, असा फतवाच निवडणूक आयोगाने काढला आहे.
या फतव्यामुळे येथील शेकडो तरुणांच्या व्यायामावर गदा आली असून परीक्षा संपल्यावर पोहण्याची मजा लुटण्यासाठी जायचे कुठे? असा सवाल शाळकरी मुलांनी केला आहे. सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुलातील बंदिस्त असलेले वाजपेयी सभागृह कल्याण-डोंबिवली महापालिकेने निवडणूक आयोगाला दिले आहे. ठाणे, भिवंडी, पालघरसह कल्याण लोकसभेसाठी 29 एप्रिलला मतदान होणार आहे. मात्र निवडणूक आयोगाने आजच पत्रक काढून क्रीडा संकुलातील तरणतलाव आणि व्यायामशाळा तत्काळ बंद करण्याचा फतवा काढला आहे.

































































