केमिकल स्फोटांनी डोंबिवली पुन्हा हादरली

770

कधी रासायनिक गुलाबी रस्ता.. तर कधी धुरांचे लोट यामुळे सदैव वादाच्या भोवऱयात सापडलेली एमआयडीसी आज केमिकलच्या स्फोटांनी पुन्हा एकदा हादरली. फेज-2 मधील मेट्रोपोलिटीन एक्सिम लिमिटेड या कंपनीत भीषण अग्नितांडव झाले. शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत केमिकलच्या गोदामासह अख्खी कंपनीच जळून खाक झाली. सुदैवाने कोणतीही प्राणहानी झाली नाही. कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाले असून धुराच्या लोटामुळे लाखो नागरिक घुसमटले. या घटनेने पुन्हा एकदा डोंबिवलीकरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या