एपस्टीन फाईल्समध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर बलात्काराचा आरोप, अमेरिकेच्या न्याय विभागाकडून मात्र बचाव

अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करणाऱ्या जेफ्री एपस्टीन याच्याशी संबंधित प्रकरणात प्रथमच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आल्याचे उघड झाले आहे. यामुळे खळबळ उडाली असून अमेरिकेच्या न्याय विभागाने मात्र यासंदर्भात ट्रम्प यांचा आश्चर्यकारक बचाव केला आहे.

एपस्टीनप्रकरणाशी संबंधित 30 हजार नव्या फाईल्स मंगळवारी रात्री अमेरिकेच्या न्याय विभागाने प्रसिद्ध केल्या. एपस्टीन फाईल्समध्ये ट्रम्प यांचे नाव शेकडो वेळा आले आहे. त्यांची आणि एपस्टीन यांची एके काळी घनिष्ठ मैत्री होती. एपस्टीन याच्या ‘लोलिता’ या विमानातून ट्रम्प यांनी 8 वेळा प्रवास केल्याच्या नोंदी आतापर्यंत उघड झाल्या आहेत. मात्र, ट्रम्प यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आल्याचे प्रथमच उघडकीस आले आहे. मंगळवारी जाहीर झालेल्या फाईल्समध्ये एका महिलेने केलेला दावा समोर आला आहे. ट्रम्प आणि एपस्टीन या दोघांनीही तिच्यासोबत गैरकृत्य केले होते, असा तिचा आरोप आहे. या फाईल्समध्ये एका चालकाचा जबाब आहे. ट्रम्प आणि एपस्टीन हे एका मुलीसोबत दुराचाराबाबत बोलत असल्याचे त्याने ऐकले होते.

पीडितेचा संशयास्पद मृत्यू, तपास अर्धवट

साधारणतः दशकभरापूर्वी ट्रम्प यांच्यावर आरोप करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर काही दिवसांमध्येच पीडितेचा गोळी लागल्यामुळे संशयास्पद मृत्यू झाला होता. याप्रकरणाचा एफबीआयने तपास केला की नाही, हे एपस्टीन फाईल्समधून उघड झालेले नाही. ट्रम्प यांना दोषी ठरविण्यात आल्याचे या फाईल्समध्ये कुठेही म्हटलेले नाही, असे सरकारने म्हटले आहे.

आरोपात किंचित जरी सत्य असते तर…

अमेरिकेच्या न्याय विभागाने याप्रकरणात ट्रम्प यांचा बचाव केला आहे. न्याय विभागाने ‘एक्स’वर यासंदर्भात पोस्ट टाकली आहे. त्यात म्हटले आहे की, ट्रम्प यांच्याविरोधात करण्यात आलेले आरोप खोटे असून त्यात विश्वासार्हता नाही. त्यात किंचित जरी खरे असते तर, ट्रम्प यांच्याविरोधात यापूर्वीच त्यांचा वापर झाला असता. वर्ष 2020पूर्वीच एफबीआयकडे यासंदर्भात माहिती देण्यात आली होती.

अमेरिकेच्या न्याय विभागाकडून मात्र बचाव

अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करणाऱया जेफ्री एपस्टीन याच्याशी संबंधित प्रकरणात प्रथमच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आल्याचे उघड झाले आहे. यामुळे खळबळ उडाली असून अमेरिकेच्या न्याय विभागाने मात्र यासंदर्भात ट्रम्प यांचा आश्चर्यकारक बचाव केला आहे.