मद्यपान अन् ड्रायव्हिंग यांचं ‘कॉकटेल’ करू नका! मुंबई पोलिसांची हटके जनजागृती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नागरिकांच्या संरक्षणासाठी मुंबई पोलीस सदैव तत्पर असतात. वाहतुकीचे नियम, सायबर क्राईम असो किंवा कोरोनाविषयक सूचना याबाबत पोलीस सोशल मीडियावरून हटके स्टाईलने नागरिकांना संदेश देताना दिसतात. शहरातील वाढत्या उकाडय़ाच्या पार्श्वभूमीवर ‘बीट द मुंबई हिट’ असं म्हणत मुंबई पोलिसांनी इन्स्टाग्रामवर केलेली भन्नाट पोस्ट सध्या नेटिझन्सचे लक्ष वेधून घेतेय.

मुंबई पोलिसांनी एक फोटो पोस्ट केला आहे. पह्टोच्या वरच्या बाजूला ‘ड्रिंक्स फॉर अ कूल समर राईड’ असं लिहिलं असून त्याखाली नारळ पाणी, लिंबू सरबत आणि मोसंबी ज्युसचे पह्टो पाहायला मिळत आहेत. वाढत्या उकाडय़ावर मात करण्यासाठी हे योग्य पर्याय असल्याचे म्हटले आहे. खालच्या बाजूला मद्याची बाटली दिसत असून त्यावर लाल रंगाची फुली मारण्यात आली आहे.

पॅप्शनमध्ये पोलिसांनी म्हटलंय, ‘फळांचा ताजा ज्युस कदाचित तुम्हाला रस्त्यावर लक्ष पेंद्रित करण्यासाठी मदत करेल, पण काही ड्रिंक तुमच्यासाठी घातक ठरू शकतात. मद्यपान करणे अन् वाहन चालवणे या दोन क्रियांचे कॉकटेल करू नका! नियम पाळा, चिल्ल करा.’ पोलिसांची ही हटके पोस्ट नेटिझन्सच्या पसंतीस उतरत असून त्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत.