
मुखदुर्गंधीसाठी आपण अलीकडे माऊथवाॅश वापरतो. परंतु माऊथवाॅश रोज वापरणे हितावह नसते. दिवसातून दोनवेळा आपण योग्य पद्धतीने ब्रश करणे हे गरजेचे आहे. म्हणजे आपल्याला माऊथवाॅशचीही गरज पडणार नाही.
माऊथवाॅशमध्ये विविध रासायनिक द्रव पदार्थ असतात. हे द्रव्य पदार्थ आपल्या दातांना किड लागण्यापासून वाचवतात. जसे की, अॅंटी बैक्टेरियल एजेंटस्, फ्लोराइड तसेच इतर विविध तेलही असतात. याचा उद्देश हा तोंडातील किटाणू तसेच इतर बॅक्टेरिया कमी करणे हे आहे. यामुळे श्वासाच्या दुर्गंधीपासून आपला बचाव होतो.
माऊथवाॅश वापरण्याचे फायदे
मुखदुर्गंधीपासून तात्काळ सुटका होतो. तसेच तोंडातही फ्रेशनेस निर्माण होतो.
दाताला कीड लागण्याची शक्यता कमी होते. यामुळे किटाणूंच्या वाढीचा वेगही मंदावतो.
दाढांना सुरक्षित ठेवण्यासाठी, तसेच हिरड्यांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी माऊथवाॅश उत्तम मानला जातो.
Hair Care – रात्री झोपताना ‘या’ चुकांमुळे तुमचे केस कुरळे आणि तुटू शकतात
माऊथवाॅश रोज वापण्याचे धोके
माऊथवाॅश अधिक प्रमाणात वापरल्याने, तोंड सुकण्याची शक्यता असते.
अधिक प्रमाणात माऊथवाॅशचा वापर केल्याने, आपल्या तोंडात लाळ कमी होते. लाळ कमी झाल्याने बॅक्टेरिया तोंडात वाढण्याचा धोका असतो.
आपल्या तोंडात चांगले आणि वाईट असे दोन प्रकारचे जीवाणू असतात. अधिक माऊथवाॅशच्या वापराने चांगले जीवाणू सुद्धा मरतात.
माऊथवाॅश मोठ्या प्रमाणात वापरल्याने, आपल्या तोंडात आग होणे, तोंडात जखमा होणे तसेच अॅलर्जी होणे या समस्या उद्भवतात.
निरोगी दात आणि हिरड्यांसाठी रोज किमान दोन वेळा योग्य पद्धतीने ब्रश करणे हे खूप आवश्यक आहे. रोज योग्य पद्धतीने ब्रश केल्यास, माऊथवाॅशची गरज भासणार नाही.