
सध्या बाजारात वेगवेगळ्या कंपन्यांचे अँड्रॉइड फोन बाजारात उपलब्ध आहेत. मात्र एक काळ असा होता की मोबाइल फोन म्हटले की नोकिया कंपनीचाच असे काहीसे गणित होते. नोकियाचे कमी किमतीत टिकाऊ व मजबूत फोन उपलब्ध असल्याने सर्व मोबाईल शौकिनांना नोकियाच्या मोबाईलची भुरळ पडली होती.
नोकिया आता पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांच्या पसंतीस उतरण्यास सज्ज झाला आहे. कारण नोकियाने नुकताच आपला 2760 फ्लिप फोन लाँच केला आहे. विशेष बाब म्हणजे या मोबाइलला दोन डिस्प्ले व कॅमेरा असून या फोनची किंमत केवळ 1,500 रुपये आहे. या फोन मध्ये इतर अनेक फीचर्स उपलब्ध आहेत. मोबाईलच्या की पॅडवर मोठे बटन दिल्याने ज्येष्ठ नागरिकांना हा फोन वापरणे सोपे जाणार आहे.
नोकियाचा 2760 फ्लिप फोन क्लॅमशेल डिझाईन मध्ये काळ्या रंगात उपलब्ध असणार आहे. एकदा चार्ज केल्यानंतर या फोनला 3.8 तासांचा टॉकटाइम मिळतो, तसेच 18 दिवसांचा स्टॅण्डबाय टाइम मिळत असल्याचा दावा कंपनीच्या वतीने करण्यात आला आहे. नोकियाने नुकताच अमेरिकेत हा फोन लाँच केला असून याची किंमत 19 अमेरिकन डॉलर एवढी ठेवली आहे. हिंदुस्थानात या फोनच्या उप्लब्धतेविषयी कंपनीने कोणतीच माहिती दिलेली नाही.
हे आहेत फीचर्स –
2.83 इंच इंटर्नल एलसीडी स्क्रीन
1.77 इंच एक्सटर्नल स्क्रीन
1.3 गिगाहर्टझ क्वाड कोर प्रोसेसर
4 जीबी इंटर्नल मेमरी
5 मेगापिक्सल कॅमेरा सेन्सर फ्लॅशसह
वेब ब्राऊजिंग, ईमेल यांसारख्या गोष्टी





























































