25 लाखांच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ, पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

511

पुण्यात कंपनी टाकण्यासाठी माहेरून 25 लाख रुपये घेऊन यावेत यासाठी विवाहितेचा छळ करण्यात आल्याची घटना लातूरमध्ये घडली आहे. विवाहितेला जीवे मारण्याची धमकी दिली म्हणून सासरच्या 5 जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी सुचिता कुशल यल्लम या विवाहितेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. 9 मे 2017 रोजी फिर्यादीचे लग्न कुशल याच्यासोबत झाले होते. लग्नामध्ये वडिलांनी 7 लाख 50 हजार रुपये हुंडा दिला होता. साडे सात तोळे सोने, नवरा कुशल यास शेरवानीसाठी 60 हजार रुपये दिले होते. सर्व मानपान करुन लग्न लावून दिले होते. फिर्यादी ही पुण्यात खासगी कंपनीत नोकरी करत होती. त्यामुळे लग्नानंतर ती नवऱ्यासह राहण्यासाठी पुण्यात गेली होती. मात्र पगाराची रक्कम माझ्याकडे दे म्हणून नवरा कुशल तिला शिवीगाळ व मारहाण करीत होता.

तिला मुलगा झाल्यानंतर मुलगा पाहण्यासाठी आलेल्या कुशल याने तुझ्या वडिलांना नोकरी आहे, भावाला नोकरी आहे, मला पुण्यात कंपनी टाकण्यासाठी 25 लाख रुपये त्यांच्याकडून घेऊन ये तरच तुला नांदवतो. अन्यथा नांदवणार नाही, असे सांगितले. पैसे मिळणार नाहीत असे सांगितले असता त्याने शिवीगाळ करून मारहाण केली. या प्रकरणी कुशल यल्लम, कल्पना यल्लम, पांडूरंग यल्लम, अनु यल्लम, साहेबराव यल्लम यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या