नवकल्पनांचे स्टार्टअप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. अमित बागवे 

नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा उद्योग- व्यवसाय सुरू करण्याकडे तरुणाईचा कल आहे आणि फक्त तरुणाईच नव्हे तर चाळिशी पार केलेले अनेक जण आज नोकरी सोडून व्यवसायाकडे वळत आहेत. कोरोनानंतरच्या काळात तंत्रज्ञान आधारित स्टार्टअप मोङ्गय़ा प्रमाणात वाढत आहेत.

स्टार्टअप इंडिया हा आपल्या सरकारचा एक प्रमुख उपक्रम आहे, ज्याचा उद्देश स्टार्टअप संस्कृतीला म्हणजेच नवउद्योजकांना प्रेरित करणे आणि हिंदुस्थानात नवकल्पना आणि उद्योजकतेसाङ्गी एक मजबूत आणि सर्वसमावेशक परिसंस्था तयार करणे हा आहे.

 देशातील मान्यताप्राप्त स्टार्टअप्सच्या संख्येनुसार महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे ही एक अभिमानाची गोष्ट आहे. देशात मान्यताप्राप्त ‘स्टार्टअप’ची संख्या 2016 मध्ये 471  वरून 2022 पर्यंत 86,713 इतकी वाढली आहे. स्टार्टअप उपक्रमशीलतेत आपण जगात तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.

नवीन उद्योजकांसाङ्गी स्टार्टअप इंडियाच्या अंतर्गत इन्क्युबेशन पेंद्र, सुलभ पेटंट व आयपीआर सुविधा, कर लाभ, टॅक्स हॉलिडे, पंपनी स्थापन करताना येणाऱ्या अडचणी दूर करणे, काwशल्य विकास कार्यक्रम, प्रधानमंत्री युवा योजना, स्टार्टअप इंडिया लोन योजना, SIDBI द्वारे व्यवस्थापित केलेल्या दहा हजार कोटी निधीच्या रूपात आर्थिक उत्तेजन अशा अनेक सोयी दिल्या जात आहेत.

सरकारने स्टार्टअप इंडिया व्हिजन, 2024 लाँच केले आहे. यामध्ये उद्योजक आणि सरकारी एजन्सींमधील सुसुत्रतेसाङ्गी   डिजिटल इंडिया प्लॅटफॉर्मची स्थापना, सुरुवातीच्या टप्प्यात पायाभूत सुविधा निर्माण करणे आणि नवीन तंत्रज्ञानाच्या विकासाला प्रोत्साहन देण्यासाङ्गी ‘डिजिटल इंडिया फेलोशिप’सारख्या अनेक उपक्रम सुरू करणे समाविष्ट आहे.

‘स्टार्टअप इंडिया व्हिजन 2024’ या नवीन धोरणांतर्गत सरकारने 2024 पर्यंत किमान 50 हजार नवीन स्टार्टअप, 500 नवीन इन्क्युबेटर आणि 100 इनोव्हेशन झोन स्थापन करण्याची घोषणा केली आहे.

स्टार्टअप आज मोङ्गय़ा प्रमाणात शेअर मार्केटमध्ये लिस्टिंग करून भांडवल उभारत आहेत. मुंबई शेअर बाजारात  400हून अधिक लघुउद्योजकांनी लिस्टिंग करून भांडवल उभारणी केली आहे. अँजेल इन्व्हेस्टर, व्हेंचर पॅपिटल, क्राऊड फंडिंग अशा  अनेक भांडवल उभारणीच्या संधी स्टार्टअप्ससाङ्गी उपलब्ध आहेत.

शेवटी असे म्हणता येईल की, हिंदुस्थान सरकारने गेल्या काही वर्षांत स्टार्टअप्स आणि देशातील नवोदित उद्योजकांना पाङ्गिंबा देण्यासाङ्गी अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. यामुळे उद्योजकांना आवश्यक पाङ्गबळ  आणि मार्गदर्शन मिळत आहे.  त्यांच्या उद्योजकीय प्रवासाला सुरुवात करण्यासाङ्गी अधिक व्यवहार्य आणि आकर्षक वातावरण निर्माण केले आहे.