सहाव्या राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी डॉ. नितीन करीर

राज्याचे माजी मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांची सहाव्या राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आयोगाचे अध्यक्ष मुकेश खुल्लर यांच्या निधनाने ही जागा रिक्त झाली होती. खुल्लर यांची या पदावर 1 एप्रिल 2025 रोजी नियुक्ती करण्यात आली होती. परंतु नियुक्तीनंतर जेमतेम तीन महिन्यांत म्हणजेच 7 जुलै 2025 रोजी त्यांचे आकस्मिक निधन झाले. या जागेवर आता नितीन करीर यांची नियुक्ती झाली आहे.