डॉ. कुरुलकर यांना 29 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरविल्याप्रकरणी दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अटक केलेले डीआरडीओचे संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर यांची विशेष न्यायालयाने 29 मेपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. त्यानुसार डॉ. कुरुलकर यांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

डॉ. कुरुलकर यांना न्यायालयीन कोठडीत कारागृहातील विशेष कक्षामध्ये ठेवण्यात येणार आहे. डॉ. कुरुलकर यांना मधुमेह असल्याने त्यांना कारागृहात औषधे उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. न्यायालयाने ही मागणी मान्य केली.