
‘पुढारी’चे मुख्य संपादक, पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त उद्या सकाळी 9.30 वाजता कोल्हापूर येथील पोलीस परेड ग्राऊंडवर सहस्रचंद्रदर्शन सोहळा होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे आदींच्या हस्ते व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली हा सत्कार सोहळा होणार आहे. यासाठी खासदार शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय संघटना तसेच तालीम मंडळांच्या कार्यकर्त्यांचा समावेश असलेली नागरी गौरव सत्कार सोहळा समिती स्थापन करण्यात आली आहे. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती या सोहळ्याला असणार आहे.





























































