शांततेच्या आवाहनामुळे शहरात अनुचित प्रकार नाही -सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात येणाऱ्या निकालासंदर्भात पोलिसांनी विविध संघटना, पदाधिकाऱ्यांना शांततेचे आवाहन केले होते. त्यानुसार न्यायालयाच्या निकालानंतर शहरात कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. पोलिसांनी मराठा समाजातील विविध संस्था आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना केलेल्या आवाहनाला चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यानुसार कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. दरम्यान, निर्णयाच्या पार्श्वभूमीवर शहरातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिली आहे.

पोलिसांनी मराठा समाजातील विविध संघटना आणि संस्थांच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क ठेवला होता. व्यक्तिगत पातळीवर पोलिसांनी प्रत्येकाशी संवाद साधल्यामुळे बहुतांश पदाधिकाऱ्यांनी आवाहनाला प्रतिसाद दिला. शहरात करोनाचा संसर्ग वाढत असताना आंदोलने, निदर्शने करण्याची भूमिका योग्य नाही, असे आवाहन पोलिसांनी केले होते. त्यानुसार मराठा समाजातील सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रतिसाद दिला. शहरात अनुचित प्रकार घडले नाहीत, असे डॉ. शिसवे यांनी सांगितले.