
पावसाळा तोंडावर आला असतानाही नालेसफाईचे काम करण्यात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदाराला पालिकेने साडेतीन लाखाचा दंड ठोठावला आहे. शिवाय त्याच्याकडून निर्धारित कामही करून घेतले जाणार आहे. तर काम वेगाने करण्यासाठी दुसऱ्या कंत्राटदाराला काम देण्यात आले आहे. वरळी, दादर, माहीम, धारावी, वडाळा या भागातील नालेसफाईच्या कामात दिरंगाई केल्याने भूमिका कंपनीला आधी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. भूमिका कंपनीने वाहतुकीचा अडथळा असे कारण देत स्पष्टीकरण दिले होते. कंपनीचे उत्तर समाधानकारक नसल्याने संबंधित कंत्राटदाराला दरदिवशी दहा हजार याप्रमाणे साडेतीन लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.


























































