रत्नागिरी जिल्ह्यातील 18 गावात पाणीटंचाई; टँकरने पाणीपुरवठा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरी जिल्ह्यात पाणीटंचाई सुरु झाली आहे. जिल्ह्यातील 18 गावातील 30 वाड्यांमध्ये राहाणाऱ्या 3,826 ग्रामस्थांना 7 टॅंकरनी पाणीपुरवठा करण्यात येत आहे. कोरोनाच्या संकटात पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. अशावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी पाणीटंचाईच्या उपाययजनेबाबतचे सर्व अधिकार प्रांताधिकाऱ्यांकडे सोपावले आहेत.

मंडणगड तालुक्यात दोन गावातील दोन वाड्यातील 610 जणांना एका टॅंकरने, खेड तालुक्यातील 6 गावातील 8 वाड्यातील 611 जणांना एका टॅंकरने, चिपळूण तालुक्यातील 6 गावातील 13 वाड्यातील 1520 जणांना दोन टॅंकरने,संगमेश्वर तालुक्यातील 3 गावातील 6 वाड्यातील 935 जणांना दोन टॅंकरने आणि लांजा तालुक्यातील एका गावातील एका वाडीतील 10 लोकांना एका टॅंकरने पाणी पुरवठा सुरु आहे.