व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतींवर ड्रोन हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । काराकस

व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांच्यावर शनिवारी ड्रोन हल्ला झाला. त्यावेळी ते लाइव्ह भाषण करत होते. सुदैवाने या हल्ल्यातून ते बचावले असून सात जण जखमी झाले आहेत.

मादुरो हे व्हेनेझुएलाची राजधानी काराकसमध्ये शेकडो सैनिकांसमोर लाइव्ह भाषण करत होते. त्याच दरम्यान एक ड्रोन उडत त्यांच्याजवळ आलं आणि त्यातून काही विस्फोटकं खाली पडली. विस्फोटक पडलेल्या ठिकाणापासून निकोलस थोडे लांब उभे असल्याने ते यातून बचावले. मात्र, तिथे उभे असलेले सात जण या हल्ल्यात जखमी झाले आहेत, अशी माहिती व्हेनेझुएलाचे माहिती आणि प्रसारण मंत्री जॉर्ज रॉड्रिग्ज यांनी दिली आहे.

ड्रोनवर विस्फोटकं बांधून हा हल्ला केला गेलेला असला तरीह तिथे असलेल्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी विस्फोटकांच्या स्फोटाला आवर घालत त्यांना निकामी करून टाकलं. व्हेनेझुएला सरकारने मादुरोंवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत विरोधी पक्षावर या हल्ल्यासाठी जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.