
सामना ऑनलाईन । तापी
गुजरातच्या तापी जिल्ह्यातील मल गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ग्रामस्थ चार कि.मी पायपीट करून एका बोरवेलमधून हंडाभर पाणी नेतात. या हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थ पहाटे चार वाजल्यापासून रांगेत उभे राहतात.
Songadh, Tapi: Mal village, nearly 30 km away from Ukai dam, is facing water scarcity. A borewell was being drilled here today. A local says, “there is no road connectivity for water tankers to reach here. We walk around 4 km daily to nearest handpump to collect water”.#Gujarat pic.twitter.com/uc1gf0ZtNR
— ANI (@ANI) April 9, 2019
या गावात रस्त्यांची योग्य सुविधा नसल्याने पाण्याच्या टँकरची सुविधा देता नाही अशी तक्रार काही गावकर्यांनी केली आहे. या गावापासून 30 कि.मी अंतरावर उकई धरण आहे. परंतु तरीही ग्रामस्थ पाण्यापासून वंचित आहे. धरण उशाला कोरड घशाला असे म्हणण्याची वेळ या ग्रामस्थांवर आलेली आहे.

























































