
एनसीबी पथकानं अभिनेता चंकी पांडे याची मुलगी अभिनेत्री अनन्या पांडे हिच्या घरी छापा टाकला आहे. एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी व्ही. व्ही. सिंह यांच्या नेतृत्वाखाली हा छापा टाकण्याचा आला आहे. या प्रकरणी अद्याप अधिक माहिती मिळू शकलेली नाही. मात्र असे बोलले जात आहे की, या धाडीचा संबंध आर्यन खान ड्रग केसशी असू शकतो. अनन्या ही आर्यनची मैत्रीण आहे.
शाहरुखच्या घरीही पोहोचली एनसीबीची टीम
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची (एनसीबी) टीम अभिनेता शाहरुख खानच्या घरी (मन्नत बंगला) देखील पोहोचली आहे. गुरुवारी सकाळी शाहरुख तुरुंगात मुलगा आर्यन खानला भेटण्यासाठी गेला होता.





























































