
पुणे शहरातील वडगाव बुद्रूक परिसरात मेफेड्रॉन (एम.डी) या अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या तस्कराला सिंहगड पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 8 लाख 9 हजारांचे 63 ग्रॅम मेफेड्रॉन जप्त करण्यात आले आहे. मोहम्मद अब्दुल रहमान इरशाक (वय 23, रा. मुंढवा, मूळ-केरळ ) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
सिंहगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास घेवारे आणि त्यांचे पथक हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी दुचाकीवरून एक तरूण अंमली पदार्थ विक्रीसाठी वडगाव बुद्रूक परिसरात येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी किशोर शिंदे आणि धनाजी धोत्रे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून मोहमंदला ताब्यात घेतले. त्याच्याकडे 8 लाख 9 हजारांचे 63 ग्रॅम मेफेड्रॉन आढळून आले.
पोलिसांनी मोहम्मदविरोधात एनडीपीएस अॅक्टनुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. त्याच्याकडील अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास घेवारे, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे, सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले, पोलीस उपनिरीक्षक कुलदीप संकपाळ, पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे, मोहन भुरूक, आबा उत्तेकर, राजेश गोसावी, सचिन माळवे, शंकर कुंभार, नीलेश कुलथे, किशोर शिंदे, दयानंद तेलंगेपाटील, पुरुषोत्तम गुन्ला, योगेश झेंडे, अविनाश कोंडे, राहूल शेडगे, धनाजी धोत्रे, रफिक नदाफ, उज्ज्वल मोकाशी यांच्या पथकाने केली.


























































