
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने गुन्हेगारांची भरती पक्षात सुरू केली आहे. तुळजापूर शहरात झालेल्या ड्रग्ज तस्करी प्रकरणातील आरोपी संतोष परमेश्वरला थेट भाजप प्रवेश देत पक्षात पायघड्या घातल्याचा आरोप होत आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात 35 जणांवर गुन्हे दाखल झाले होते. या प्रकरणात पोलिसांनी बेड्या ठोकलेला आणि सध्या जामिनावर बाहेर असलेला संशयित आरोपी संतोष परमेश्वर याने भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीमध्ये पक्षात प्रवेश केला. परमेश्वर यांच्या प्रवेशामुळे भाजप तसेच तुळजापूरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी लोकशाही व्यवस्थेत पक्ष वाढविण्याचा अधिकार सगळय़ांना आहे, पण गुन्हेगारांना आसरा देणे ही जबाबदार राजकारणाची पद्धत नसल्याचे म्हटले आहे. तुळजापूरमधील या प्रकाराकडे आपण गांभीर्याने लक्ष घालून संबंधितांविरुद्ध योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी फडणवीसांकडे केली आहे.
ड्रग्ज तस्करीला राजाश्रय नको – सुप्रिया सुळे
ड्रग्ज तस्करीला राजाश्रय मिळतोय हे अत्यंत चिंताजनक आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना राजकीय पक्षात स्थान देणे म्हणजे समाजविघातक प्रवृत्तींना प्रोत्साहन देणे होय. महाराष्ट्रात ड्रग्ज तस्करीला राजाश्रय दिला जाणार नाही, असा संदेश सरकारकडून गेला पाहिजे, असे सुप्रिया सुळे यांनी फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
प्रति
मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस,
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
मंत्रालय, मुंबईविषय : तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपीस भारतीय जनता पक्षात दिलेल्या प्रवेशासंबंधी तातडीने कारवाई करणेबाबत..
मा. महोदय,
सप्रेम नमस्कार,तुळजापूर शहरातील काहीजणांना काल भारतीय जनता पार्टीमध्ये…
— Supriya Sule (@supriya_sule) November 12, 2025


























































