इचलकरंजीत मद्यधुंद चालकाने 5 गाड्यांना ठोकलं, नागरिकांनी दिला चोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
सामना प्रतिनिधी । इचलकरंजी
इचलकरंजी शहरामध्ये मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने वाहन चालवून रस्त्याच्याकडेला पार्क केलेल्या 3 दुचाकी व 2 चारचाकी वाहनांना ठोकलं. यावेळी संतप्त नागरिकांनी मद्याधुंद चालकाला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिलं. तोसिम शाबुद्दीन मुल्ला असे या मद्यधुंद वाहनचालकाचे नाव आहे.
इचलकरंजी शहरात मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास मद्यधुंद अवस्थेतील तोसिम मुल्ला त्याच्या इंडिका कारमधून नदीवेस नाक्याकडून राजवाडा चौकाकडे भरधाव वेगाने जात होता. यावेळी गुजरी पेठ येथे आल्यानंतर मुल्ला याचा आपल्या गाडीवरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या 3 दुचाकी 2 चारचाकी वाहनांना धडक दिली. यावेळी मोठा आवाज झाल्यामुळे परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी मुल्ला हा मद्यधुंद अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले. काही नागरिकांनी मद्यधुंद वाहनचालकास पकडून चोप दिला आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.