बदकाने दिला मानवतेचा धडा! भुकेल्या माशांना खाऊ घातलं अन्न 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. मात्र सध्या एका बदकाच्या व्हिडीओने सगळ्यांची मनं जिंकली आहेत. हा व्हिडीओ माणसाला मानवता शिकवणारा आहे. गरजेच्या वस्तू स्वतःजवळ न ठेवता इतरांसोबत वाटून घेण्यात सुख असते हे दाखवणारा आहे.

अवघ्या 30 सेकंदांचा हा व्हिडीओ आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. यात एक बदक भुकेल्या माशांना दाणे देण्यासाठी धडपड करताना दिसतोय. दोन-तीन मासे एकाचवेळी बदकाच्या चोचीतून दाणे खाताना दिसतायत. हा व्हिडीओ आतापर्यंत 88 हजार लोकांनी पाहिला आहे तर 10 हजार लोकांनी लाईक केला आहे.