
सामना ऑनलाईन । मुंबई
वांद्रे स्थानकानजिक धीम्या मार्गावर सिग्नल यंत्रणेतील बिघाडाने पश्चिम रेल्वे बुधवारी रात्री विस्कळीत झाली. धिम्या मार्गावर रात्री 9.45च्या सुमारास हा बिघाड झाल्याने लोकल गाड्यांच्या एका मागोमाग रांगा लागल्याने पश्चिम रेल्वेच्या धिम्या लोकल जलद मार्गावरून वळविण्यात आल्या. त्यामुळे जलद मार्गावरील लोकल सेवेलाही फटका बसला.
मध्य रेल्वे विस्कळीत
मध्य रेल्वेने बकरी ईदच्या दिवशीही रविवारच्या वेळापत्रकाप्रमाणे लोकल गाड्यांच्या कमी फेर्या चालविल्याने सुट्टीच्या दिवशी कुटुंबकबिल्यासह घराबाहेर पडलेल्या प्रवाशांना प्रचंड गर्दीचा सामना करावा लागला. बुधवारी मध्य रेल्वेने अचानक जाहीर न करता रविवारचे वेळापत्रक चालविल्याने अनेक फेर्या रद्द झाल्याने प्रवाशांना प्रचंड गर्दीचा सामना करावा लागला. हार्बरवर सकाळच्या पिकअवरमध्ये अनेक फेर्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. ईदच्या दिवशी जादा गर्दी असल्याने कमी फेर्या चालविल्याने मध्य रेल्वेच्या गाड्यांना प्रचंड गर्दी होती.





























































