अपघात दाव्यापोटी एसटीला बसतोय कोटय़वधीचा भुर्दंड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एसटी महामंडळाची प्रवाशांची संख्या प्रचंड घटल्याने एसटीला अपघात विमा योजना अडचणीत आली आहे. एसटी महामंडळाचे अधिकारी मोटार अपघात दाव्यांमध्ये कोर्टात योग्य पुरावे सादर करीत नसल्यामुळे अपघात दावा प्राधिकरण एसटीलाच नुकसानभरपाई देण्याचे आदेश देत आहे. त्यामुळे अशा प्रकरणात अपघात चौकशी अधिकाऱयाने न्यायालयात साक्ष न दिल्यास एसटीला होणारे आर्थिक नुकसान संबंधित चौकशी अधिकाऱयाकडूनच वसूल करा असा सल्ला महामंडळाच्या विधी शाखेने एसटीच्या एमडींना दिला आहे. मध्य प्रदेशातील नर्मदा नदीच्या पुलावरून अमळनेर आगाराची एसटी कोसळून 13 जण ठार झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मोटार अपघात दाव्याप्रकरणी घ्यावयाच्या दक्षतेबाबत विधी खात्याने परिपत्रक काढले आहे.