
Duleep Trophy 2025 चा रणसंग्राम आता अंतिम टप्प्यात आला आहे. या स्पर्धेत सहा संघांनी अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी एकमेकांना कडवी झुंज दिली. अखेर दक्षिण विभाग आणि मध्य विभागाने अंतिम फेरीत आपली जागा पक्की करण्यात यश मिळवलं. त्यामुळे आता अंतिम फेरीत दक्षिण विभाग आणि मध्य विभाग यांच्यात रंगतदार लढाई होईल, अशी क्रीडा प्रेमींना अपेक्षा आहे.
दक्षिण आणि मध्य विभागाने संपूर्ण स्पर्धेत दमदार प्रदर्शन केलं आहे. मध्य विभागाने सेमी फायनलमध्ये शार्दुल ठाकूरच्या पश्चिम विभागाला पराभुत केलं होतं. तर दुसऱ्या सेमी फायनलमध्ये दक्षिण विभागाने उत्तर विभागाचा पराभव करत अंतिम फेरी गाठली. त्यामुळे आता दक्षिण विभाग आणि मध्य विभाग यांच्यात अंतिम फेरीचा धमाका 11 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. बंगळुरूच्या सेंटर ऑफ एक्सीलेंन्समध्ये 11 ते 15 सप्टेंबरदरम्यान अंतिम सामना खेळला जाणार आहे. 11 तारखेला सकाळी 9.30 वाजता सामना सुरू होईल.
मध्य विभागाचा संघ
ध्रुव जुरेल (कर्णधार), रजत पाटीदार (उप कर्णधार), आर्यन जुयाल, यश राठोड, डॅनिश मालेवार, हर्ष दुबे, शुभम शर्मा, मानव सुथार, खलील अहमद, दीपक चहस, कुलदीप यादव, आदित्य ठाकरे, संजीत देसाई, सरांश जैन आणि आयुष पांडे
दक्षिण विभागाचा संघ
तिलक वर्मा (कर्णधार), मोहम्मद अझरुद्दीन (उप कर्णधार), तन्मय अग्रवाल, रिकी भुई, नारायण जगदीसन, स्नेहल कौठणकर, देवदत्त पडिक्कल, सलमान निजार, नेदुमंकुझी बासिल, गुर्जपनीत सिंग, एमडी निधीश, साई किशोर, तनय त्यागराजन, त्रिपुराण विजय, विजयकुमार वैशाख, मोहित काळे


























































