बनावट सॅनिटायझर आणि मास्क जप्त; वजन माप खात्याची राज्यभरात कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोव्यातील वजन माप खात्याने विविध ठिकाणी कारवाई करून बनावट मास्क तसेच सॅनिटायझर मोठ्या प्रमाणात जप्त केले आहे. राज्यभरातून 806 साध्या पध्दतीचे मास्क तर 195 एन 95 मास्क जप्त केले आहेत. जप्त केलेले मास्क साध्या प्लास्टिक पिशवित बंद केलेले होते आणि त्याच्यावर कोणतीही माहिती नसल्याने खात्याने ही कारवाई केली आहे.

कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. मास्कचा वापर करा, सॅनिटायझरने हात स्वच्छ करा असे सरकारकडून आदेश जारी केले आहेत. गोव्यात सध्या मास्क व सॅनिटायझर उपलब्ध नसल्याने जनतेत गोंधळ निर्माण झाला आहे. याचाच फायदा घेऊन बनावट मास्क व सॅनिटायझर विकण्याचे प्रकार होत आहेत. वजन माप खात्याने असे बनावट मास्क व सॅनिटायझर जप्त करून विक्रेत्याला दंड ठोठावणे सुरू केले आहे.

डिचोली येथे केलेल्या कारवाईत 5 एन 95 मास्क जप्त करण्यात आले आहेत. म्हापसा येथे 485 साधे मास्क तसेच 11 एन 95 मास्क जप्त केले आहेत. पणजी येथे 33 साधे मास्क जप्त केले आहेत. मडगावात 190 एन 95 मास्क जप्त केले आहेत. फोंडा येथून 132 साधे मास्क तर 54 एन 95 मास्क जप्त केले आहेत. कुडचडेत 153 साधे मास्क जप्त केले आहेत.