यवतमाळ मध्ये भूकंप; हिंगोली, नांदेड शहरात सौम्य धक्के

earthquake-measurement

यवतमाळ जिल्ह्यातील महागाव परिसरामध्ये 4.4 रिस्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के बसले. त्याचे पडसाद हिंगोली जिल्ह्यापर्यंत उमटले. यामुळे जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नांदेड शहरात देखील सकाळी साडे आठ वाजता मालेगाव रोड, छत्रपती चौक, गणेश नगर भागात ही सौम्य धक्के जाणवले त्यामुळे नांदेड शहरातील नागरिक घाबरून गेले होते.

आज सकाळी साडेआठच्या सुमारास यवतमाळ जिल्ह्यातील महागाव परिसरात भूगर्भातून मोठा आवाज येत होते. याचा परीघ जवळपास 150 किमी पर्यंत होता. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी व हिंगोली तालुक्यातील अनेक गावांमध्ये या धक्क्यामुळे धरणीकंप जाणवला. तसेच अर्धापूर तालुक्यातील अनेक गावामध्ये, शेजारी असलेल्या वसमत तालुक्यातील अनेक गावात भूकंपाचे धक्के जाणवले यासंदर्भात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रोहित कंजे यांनी माहिती देताना सांगितले की भूगर्भातील हालचालीमुळे या भागांमध्ये अशा स्वरूपाचे धक्के जाणवत असतात. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.

आपली प्रतिक्रिया द्या