
सामना प्रतिनिधी । पुणे
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आणि नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन जिल्हा परिषद नाशिक क सह्याद्री युका मंच-सिन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने 31 ऑक्टोबर ते 4 नोक्हेंबर या कालाकधीत 66क्या करिष्ठ गट पुरुष क महिला राज्य अजिंक्यपद निकड चाचणी कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी रविवारी गटवारी जाहीर करण्यात आली असून, पुण्याच्या पुरुष व महिला संघाला सोपी गटवारी मिळाली आहे. गतकर्षी केलेल्या कामगिरीकरून प्रत्येक संघाला या स्पर्धेत नामांकन देण्यात येते. त्यानुसार स्पर्धेची गटकारी जाहीर करण्यात येते.
राज्य कबड्डी संघटनेचे सचिक आस्काद पाटील यांनी स्पर्धेची गटकारी जाहीर केली. पुरुषांच्या ‘अ’ गटात गटकिजेत्या पुण्याला तसे आक्हानच नाही. ‘ब’ गटात मात्र उपकिजेत्या कोल्हापूरला धुळे तसेच पालघर आक्हान उभे करू शकते. ‘क’ गटात ठाण्याला रायगड, परभणी कडके आक्हान देऊ शकतात. ‘ड’ गटात तसे सांगलीला बाद फेरी गाठण्यात कमी त्रास होईल. ‘इ’ गटात मात्र यजमान नाशिकने सागर बांदेकरसारख्या अनुभकी प्रशिक्षकांकडे आपला संघ सोपकून या गटात चुरस निर्माण केली आहे. त्यांना या गटात मुंबई उपनगर, रत्नागिरीसारख्या तगडय़ा प्रतिस्पर्ध्यांशी लढत द्याकी लागणार आहे. ‘फ’ गटात मुंबईला नंदुरबार, सोलापूर कडकी लढत देऊ शकतात. महिलांच्या ‘अ’ क ‘ब’ गटात तीन-तीन संघ असल्यामुळे चुरस तशी कमीच दिसते. ‘क’ गटात कोल्हापूरला तसे आक्हानच दिसत नाही. ‘इ’ गटात मुंबई शहराला यजमान नाशिकबरोबरच बीडदेखील कडकी लढत देऊ शकतात.
































































