साधा सोपा पटकन होणारा नारळी भात

नारळीपौर्णिमेच्या निमित्ताने घरोघरी नारळीभात किंवा साखरभात हा तयार करण्यात येतो. परंतु अनेकदा हा भात गिचका होतो. अशावेळी याची परफेक्ट रेसिपी बनवायची असेल तर काही टिप्स या फाॅलो करायला हव्यात.

नारळीभात करताना भात मोकळा शिजवायला हवा. याकरता तांदूळ किमान 15-20 मिनिटे पाण्यात भिजवायला हवेत. तांदूळ किमान 20 मिनिटे भिजल्यानंतर कुकरमध्ये तांदळाच्या दुप्पट पाणी टाकावं. म्हणजे समजा 1 वाटी तांदूळ असेल तर 2 वाट्या पाणी घ्यावे. त्यानंतर त्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस आणि अर्धा टेबलस्पून तेल टाकून शिजवावे. यामुळे भात मोकळा सडसडीत होतो.

तांदूळ शिजवताना सुरुवातीला गॅस मोठा ठेवावा.

त्यानंतर पाण्याला उकळी येऊ लागल्यावर, मंद आच करुन तांदूळ शिजवावा.

भात मोकळा होण्यासाठी गॅसची फ्लेम ही मंद ठेवावी. म्हणजे भात मोकळा होतो.

नारळी भात रेसिपी

साहित्य
2 टेबलस्पून तूप
3 ते 4 लवंगा
2-3 वेलची
दालचिनीचा छोटा तुकडा
1 कप खोवलेलं नारळ
1 कप साखर
1 शिजवलेला भात
केशर
अर्धी वाटी दूध
सुकामेवा

दररोज दुधात भिजवलेले 2 खजूर खाल्ले तर मिळतील आश्चर्यकारक फायदे

रेसिपी
सर्वात आधी कढईमध्ये 3 टेबलस्पून तूप टाकावे.
तूप गरम झाल्यावर लगेच त्यात लवंग, वेलची, दालचिनी टाकून ते परतून घ्यावे.
लगेच त्यामध्ये खोवलेला नारळ घालून, किमान 5 मिनिटे परतून घ्यावा.
सर्वात शेवटी साखर टाकून मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्यावे.
सुका मेवा टाकल्यानंतर शिजवलेला भात यामध्ये घालावा.
त्यावर वरुन केशराचं दूध घालावे.
त्यानंतर कढईवर झाकण ठेवावे. 5 ते 7 मिनिटे कमी गॅसवर वाफ येऊ द्या.
मोकळा नारळी भात तयार

टिप
नारळीभात ढवळताना हलक्या हाताने ढवळावा.
भाताची शिते मोडू नयेत म्हणूनच हलका हात खूप महत्त्वाचा आहे.