हिवाळ्यात मखाना खाण्याचे अगणित फायदे, वाचा

मखाना हा दैनंदिन आहारात समाविष्ट करण्यासाठी सूपरफूड मानले जाते. म्हणून आयुर्वेदामध्येही मखाना खाणे खूप महत्त्वाचे मानले जाते. मुख्य बाब म्हणजे मखाना आपल्याला आतून बळकटी देण्यास, तसेच वजन कमी करण्यातही उपयोगी मानला जातो.

चाळीशीनंतर तरुण दिसण्यासाठी फक्त हे पदार्थ आहारात समाविष्ट करा, वाचा

दिवसाची सुरुवात पौष्टिक अन्नाने करायची असेल तर आपला नाश्ता सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. आपल्याला दिवसभर ताजेतवाने राहण्यासाठी सकाळची सुरुवात मखानाने करणे हे गरजेचे आहे.

मखाना आपल्या आहारामध्ये समाविष्ट करणे हे खूप गरजेचे आहे. मखाना हा केवळ उपवासाच्या दिवशी खाण्यात येणारा पदार्थ नाही तर, मखान्याचा समावेश आपण रोजच्या आहारातही करु शकतो.

केशर घालून दूध पिण्याचे आरोग्यवर्धक फायदे, वाचा

मखाना खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे

मखाना फायबरने समृद्ध असल्यामुळे, त्यामध्ये कॅलरीज खूप कमी असतात. तसेच मखाना खाल्ल्यानंतर पोटही बराच काळ आहे आणि त्यात खूप कमी कॅलरीज आहेत. ते खाल्ल्यानंतर पोट बराच वेळ भरलेले राहते. त्यामुळे वारंवार भूक लागत नाही. वजन कमी करण्यासाठी म्हणूनच मखाना हा फार महतत्वाचा आहे.

मखानामध्ये कमी-सोडियम आणि उच्च-पोटॅशियम असते. यामुळे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत होते. तसेच मखान्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स हृदयाच्या रक्षणासाठी सुद्धा तितकेच गरजेचे मानले जातात.

मखान्याचा ग्लायसेमिक इंडेक्स हा कमी असतो, त्यामुळेच मखाना हा रक्तातील साखरेवर फार गुणकारी मानला जातो. म्हणूनच मधुमेहींसाठी मखाना हा खूप गुणकारी आणि उपयुक्त पर्याय मानला जातो.

हिवाळ्यात डाळिंबाचा रस त्वचेवर लावण्याचे फायदे, जाणून घ्या

फायबरचे प्रमाण मखान्यामध्ये खूप असल्याने, बद्धकोष्ठतेपासून सुटका होते. तसेच पचन सुधारण्यास मदत होते. मुख्य म्हणजे पोटाच्या समस्यांवर मखाना हा आहारात असणे अतिशय आवश्यक आहे.

 मखान्यामध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. यामुळे आपल्या त्वचेला फायदा मिळतो. तसेच मखाना हा आपल्या केसांच्या वाढीसाठीही तितकाच गरजेचा आहे.

अकाली वृद्धत्व कमी करण्यासाठी, मखाना हा खूप गरजेचा मानला जातो. मखाना हा त्वचेसाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. त्यामुळे त्वचा मऊ मुलायम होण्यातही मदत मिळते.

किचनमधील हा पदार्थ आहे बहुमोली, वाचा याचे खूप सारे उपयोग

मखानामध्ये असलेल्या कॅल्शियममुळे हाडांच्या मजबूतीसाठी मखानाचे सेवन खूप फायदेशीर ठरते. मुख्यत्वे महिला तसेच वृद्धांच्या आहारात मखाना असल्याने, हाडांच्या समस्येपासून मुक्ती मिळण्यास मदत होते.

मखाना कधी खायला हवा?

नाश्ता: दिवसाच्या सुरुवातीला मखाना खाल्ल्याने ऊर्जा मिळते आणि चयापचय होण्याची गती वाढीस लागते.

संध्याकाळचा नाश्ता : भाजलेला मखाना चहासोबत किंवा तळलेल्या स्नॅक्सऐवजी भूक लागल्यावर खाणे केव्हाही उत्तम.

व्यायाम : मखाना व्यायामापूर्वी आणि व्यायामानंतरच्या नाश्त्यासाठी देखील उत्तम मानला जातो.