
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
मतदारसंघातील केवळ एकाच केंद्रातील निकालाची ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटबरोबर पडताळणी पुरेशी असून त्यासाठी 50 टक्के निकाल व्हीव्हीपॅटबरोबर पडताळून पाहण्याची आणि त्यांची संख्या वाढवण्याची आवश्यकता नसल्याचे निवडणूक आयोगाने शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सांगितले.
देशातील 21 राजकीय पक्षांनी निकालाची पडताळणी 50 टक्के ईव्हीएमची व्हीव्हीपॅटबरोबर करूनच मग निकाल जाहीर करावा आणि त्यासाठी व्हीव्हीपॅटची संख्या 50 टक्क्यांनी वाढवावी, अशा मागणीची याचिका सर्वोच्च न्यायालयात केली होती. त्यावर निवडणूक आयोगाने न्यायालयात लेखी उत्तर दिले.



























































