ECI च्या नोटीसीला शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीकडून अद्याप कोणतेही उत्तर नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेले राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांनी दाखल केलेल्या याचिकेवर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक आयोगाच्या (ECI) नोटीसला अद्याप उत्तर दिलेलं नाही.

‘आम्हाला नोटीस मिळाली आहे, परंतु आम्ही अद्याप उत्तर दाखल केलेले नाही. आम्ही प्रक्रियेत आहोत आणि योग्य वेळी उत्तर दाखल केले जाईल’, अशी माहिती राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते क्लाइड क्रॅस्टो यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिल्याचं वृत्तात म्हटलं आहे.

अजित पवार यांनी 5 जुलै रोजी ECI कडे याचिका दाखल केली होती आणि त्यांचा गट खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून घोषित करण्याची आणि त्यांच्या गटाला घड्याळ चिन्ह वापरण्यास परवानगी देण्याची विनंती केली होती.