राजू पाटील यांच्या भावाची ईडी चौकशी

मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांचे बंधू आणि पक्षाचे पदाधिकारी असलेले व्यावसायिक विनोद पाटील यांची ईडीकडून आज दहा तास चौकशी करण्यात आली.

लोढा ग्रुपचे माजी संचालक राजेंद्र लोढा यांच्याशी संबंधित कथित आर्थिक फसवणूक प्रकरणी ही चौकशी करण्यात आल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणात लोढा, विनोद पाटील यांच्यासह दहा जणांवर गुन्हा दाखल आहे.