मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या विरोधात EDची पुन्हा एकदा न्यायालयात धाव, हे आहे कारण

सक्तवसुली संचालनालयाने (ED) सोमवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी 2 जून रोजी आत्मसमर्पण केल्यानंतर ‘मद्य धोरणाशी’ संबंधित कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी वाढवण्याची मागणी करणारा अर्ज दाखल केला. केजरीवाल सध्या अंतरिम जामीनावर बाहेर आहेत. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना 1 जूनपर्यंत जामीन मंजूर केला आहे.

आप मंत्री संजय सिंह यांनी सोमवारी भाजपवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ल्याचा कट रचल्याचा आरोप केला. सिंग यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, ‘तुम्ही निवडणूक हरत आहात म्हणून तुम्ही मुख्यमंत्र्यांवर हल्ल्याची योजना बनवाल? तुरुंगात इन्सुलिन न देता त्यांनी प्रथम त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. काही कागदपत्रांचा उल्लेख करत सिंह म्हणाले की अंकित गोयल नावाच्या व्यक्तीनं दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना हानी पोहोचवण्यासाठी धमकीचा संदेश लिहिला होता. या व्यक्तीचे शब्द भाजपच्या शब्दांसारखे आहेत… हे पटेल नगर, राजीव चौक मेट्रो स्टेशनवर फलाटाच्या आत आणि बाहेर दोन्ही ठिकाणी करण्यात आले आहे… आम्ही हे प्रकरण मांडणार आहोत आणि निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत… केजरीवाल यांना काही झाले तर मोदी आणि भाजप जबाबदार असतील’.