
आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांना ईडीने अटक केलेली असतानाच आज पुन्हा एकदा ईडीने दिल्लीत ‘आप’चे आमदार अमानतुल्लाह खान यांच्या घरावर आणि कार्यालयावर धाड टाकली. ईडीने दिल्ली एसीबी आणि सीबीआयने दाखल केलेल्या दोन गुह्यांच्या आधारावर ही कारवाई केली. दिल्ली वक्फ बोर्डाच्या भरती प्रक्रियेत अनियमितता केल्याचा अमानतुल्लाह खान यांच्यावर आरोप आहे. ते या बोर्डाचे अध्यक्ष होते. एसीबीने त्यांच्याविरुद्ध आर्थिक कामकाजात फेरफार केल्याचा आणि अनियमितता केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. आरोप झाल्यानंतर एसीबीने सप्टेंबर 2022 मध्ये त्यांची चौकशी केली. यानंतर अनेक ठिकाणी छापेमारी केली. यानंतर अमानतुल्लाह खान यांना अटक करण्यात आली होती.
























































