
देशातील 45 केंद्रीय विद्यापीठातील प्रवेशासाठी यंदा प्रथमच कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रेन्स टेस्ट (सीयूईटी) होणार असून शनिवारपासून नोंदणीला सुरुवात झाली. सीयूटीचे आयोजन नॅशनल टेस्टिंग एजन्सी करणार असून नोंदणी अर्ज cuet.samarth.ac.in वर उपलब्ध करून देण्यात आला आहे. उमेदवारांना 30 एप्रिलपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत देण्यात आली असून यूजी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी दिलेल्या मुदतीत नोंदणी अर्ज सादर करू शकतात.


























































