
सामना ऑनलाईन । ठाणे
ठाणे खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांना मिळालेल्या माहितीनपसार सापळा लावून पोलिसांनी सुमारे एक कोटी रुपयांचा इफेड्रीन हा अंमली पदार्थ जप्त केला आहे. हे इफेड्रीन रेव्ह पार्टीसाठी आणल्याचे आरोपीने सांगितले. याबाबत पोलीस अधिक चौकशी करत आहेत.
पोलिसांनी ठाण्यातील कौसा मुंब्रा येथे सापळा लावून अवील प्रकाश रॉबर्ट मोंथरो (वय 39,रा. खारघर, नवी मुंबई) याला शिताफीने अटक करून त्याच्याकडून मनोव्यापारांवर परिणाम करणारी 4 किलोची इफेड्रीन पावडर हा अमंली पदार्थ जप्त केला. बाजारात त्यांची किंमत एक कोटीच्या घरात आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे इफेड्रीन चैन्नईतून विक्रीसाठी आणल्याचे त्याने सांगितले. मुंब्रा भागामध्ये तरुणांच्या रेव्ह पार्टीसाठी हा पदार्थ आणल्याचेही त्याने सांगितले. याबाबत अधिक चौकशी करण्यात येत आहे.


























































