
प्रवासी जीप 150 फूट खोल दरीत कोसळल्याने 8 जणांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. उत्तराखंडमधील पिथोरागड जिल्ह्यातील मुवानी भागात थल-पिथोरागड मोटर रोडवर मंगळवारी सायंकाळी हा अपघात झाला.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस, महसूल विभाग आणि आपत्ती व्यवस्थापनाचे पथक घटनास्थळी दाखळ झाले. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले आणि जखमींना दरीतून बाहेर काढून उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे.
अपघातग्रस्त जीप मुवानीहून बोक्ता गावाकडे चालली होती. यादरम्यान थल-पिथोरागड मोटर रोडवर गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. प्रशासनाचे मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. जिल्हा प्रशासनाने अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.