आयुक्तालयात आठ वर्षे झालेल्या पोलिसांच्या होणार बदल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पोलीस महासंचालक संजय पांडये यांनी राज्यातील प्रत्येक आयुक्तालय आणि जिल्हा स्तरावर आठ वर्षे पूर्ण केलेल्या पोलीस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक आणि उपनिरीक्षकांची यादी मागवली आहे. त्या याद्या आल्यानंतर त्यातील निवडक अधिकाऱयांच्या इतरत्र बदल्या करण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येते.

एका आयुक्तालयात तसेच जिल्हास्तरावर कार्यरत असलेले आणि एकाच ठिकाणी ज्यांचा आठ वर्षांचा कालावधी पूर्ण झालेला आहे अशा पोलीस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक आणि उपनिरीक्षकांची यादी पोलीस महासंचालक कार्यालयाने मागिवली आहे. त्यानुसार मुंबई पोलीस आयुक्तालयातील जवळपास 727 आधिकाऱयांची यादी तयार करण्यात आली आहे. आता संबंधित अपर पोलीस आयुक्त, उपायुक्त यांच्याकडून अधिक माहिती घेऊन अधिकाऱयांची यादी पोलीस महासंचालक कार्यालयाला पाठवली जाणार आहे.