‘एकदा काय झालं!’चा सेट झाला प्लॅस्टिकमुक्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डॉ. सलील कुलकर्णी यांनी आपल्या आगामी चित्रपटाचे – ‘एकदा काय झालं!’चे मोशन पोस्टर सोशल मीडियावर नुकतेच रिलीज केले होते. या मोशन पोस्टरमध्ये दिसणाऱया गोष्टींच्या पुस्तकांमुळे आणि चित्रपटातील दिग्गज कलाकारांमुळे या चित्रपटाची चर्चा आतापासूनच रंगली आहे. अशातच आणखी एका गोष्टीमुळे हा चित्रपट चर्चेत आला आहे. डॉ. सलील यांनी चित्रपटाबाबत आज आणखी एक पोस्ट शेअर केली.   ‘एकदा काय झालं!’ या चित्रपटाचे चित्रीकरण कोरोनापूर्वीच झाले होते. या चित्रीकरणादरम्यान सेटवरील एकाही माणसाने प्लॅस्टिकची बाटली वापरली नाही. त्यामुळे या चित्रपटाचा सेट हा ‘प्लॅस्टिक फ्री’ राहिला. डॉ. सलील यांनी याच संदर्भातील पोस्ट सोशल मीडियावर केली. “चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एकही प्लॅस्टिकची बाटली वापरण्यात आली नाही. मला चित्रपटाचा आणि टीमचा अभिमान आहे.’’ असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.