
राष्ट्रपिता महात्मा गांधी हे फक्त एक व्यक्तीचे नाव नसून ती एक विचारधारा आहे. त्या विचारधारेला व नीतिमूल्यांना धरूनच आम्ही व आमचा काँग्रेस पक्ष चालला आहे.
गांधी कुटुंबीयासह आम्ही याच विचारधारेचा वारसा पुढे चालवत आहोत, यापुढेही चालवत राहू आणि कोणीही कितीही प्रयत्न केले तरीही ही विचारधारा कधीही नष्ट करू शकत नाही, असे प्रतिपादन मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी आज मुंबईत केले.
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबई काँग्रेसतर्फे ’महात्मा गांधीजींची विचारधारा’ या विषयावर एका व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष वीरेंद्र बक्षी, मौलाना जहीर अब्बास रिझवी, प्रवक्ते निजामुद्दीन राईंन, सुरेश राजहंस, अजंता यादव, सचिव शिवपुमार लाड उपस्थित होते.

























































