Video – खडसेंचे पक्ष सोडणे कार्यकर्ता म्हणून धक्कादायक, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया

खडसेंचे पक्ष सोडणे कार्यकर्ता म्हणून धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपुरात दिली आहे. खडसे यांनी निर्णयावर पुनर्विचार करावा आणि गेलेच तर सुखी राहावे, असेही मुनगंटीवार म्हणाले.

‘भाजप कुण्या एकाचा पक्ष नाही. हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, त्यामुळे या घडामोडीवर पक्षाने चिंतन करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. भाजपच्या विस्तारात खडसेंचे मोठे योगदान आहे. त्यांनी महाजन-मुंडे-गडकरी यांच्या खांद्याला खांदा लावून पक्ष रुजवला. मात्र खडसेंनी राष्ट्रवाद जोपासणारा पक्ष ते राष्ट्रवादाचा बुरखा घालणाऱ्या पक्षात जाणे वेदनादायी असल्याचे मुनगंटीवार म्हणाले.  सत्ता नसताना त्यांनी कार्यकर्ता बांधून ठेवला आता त्यांचा धीर खचला याबद्दल मुनगंटीवार यांनी आश्चर्य व्यक्त केले.

आपली प्रतिक्रिया द्या