
माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत वर्णी लागणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यांना दिल्लीत पक्षाकडून मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे. यावर प्रतिक्रिया देताना एकनाथ खडसे यांनी या गोष्टीचे स्वागत केले आहे.
एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच आपल्यावर अन्याय होत आला आहे अशी टीका केली होती. त्यामुळे आता जर फडणवीस दिल्लीत गेले तर त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात काय बदल होतील असे त्यांना विचारले असता त्यांनी फडणवीसांना जर केंद्रात संधी मिळाली तर त्याचा महाराष्ट्राला फायदाच होईल अशी प्रतिक्रिया दिली आहे. मात्र यावेळी त्याने दिल्लीत जाणे हे फडणवीसांच्या हातात नसून त्याचा निर्णय हायकमांड घेणार, असेही स्पष्ट केले आहे.





























































