
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे आणि भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असल्याचं दिसत आहे. अलीकडेच महाजन यांनी खडसे आणि प्रफुल्ल लोढाचा फोटो ट्वीट करत करत एकनाथ खडसेंना डिवचले होते. यालाच आता एकनाथ खडसे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. “गिरीश महाजन हे देवेंद्र फडणीस यांचे पाय चाटतात, त्यांच्या मागे पुढे फिरतात, आपण त्यांच्या सारखे केले नाही. त्यांच्यामुळेच मला भाजपबाहेर जावे लागलं”, असं खडसे म्हणाले आहेत.
एकनाथ खडसे म्हणाले की, “मी (गिरीश महाजन) तुमच्यासारखं मुख्यमंत्र्यांच्या मागे फिरत नाही. कुठेही लोटांगण घालत नाही. देवा भाऊचे पाय मी चाटत नाही.” ते म्हणाले, “भाजपातून गिरीश महाजन यांच्या वादामुळं मला बाहेर जावं लागल्याचे खडसे म्हणाले. मी 40 वर्ष रक्ताचं पाणी करुन भाजप पक्ष वाढवला आहे. हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे.”
































































