धक्कादायक! साठी पार केलेल्या सख्ख्या भावांचा महिलेवर सामूहिक बलात्कार

2892

गुजरातमधील बनासकाठा येथे साठी पार केलेल्या दोन भावांनी समाजाने वाळीत टाकलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. दोन्ही आरोपींचे वय 65 पेक्षा जास्त असून बलात्काराच्या घटनेनंतर दोघेही फरार झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहे.

‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार, पीडित महिलेचे वय 50 वर्ष आहे. तिच्या मुलाने जातीबाहेरील मुलीशी विवाह केल्याने गावातील पंचायतीने महिलेस कुटुंबाला वाळीत टाकले होते. गावातील लोकांनी वाळीत टाकल्याने पीडितेच्या कुटुंबाला अनेक समस्येचा सामना करावा लागत होता. त्यांच्या या परिस्थितीचा फायदा त्यांच्याच जातीच्या दोन व्यक्तींनी घेतला आणि पीडितेच्या कुटुंबाला गावात आणि जातीमध्ये परत घेण्याचे आमिष दिले. आरोपींनी महिलेला निर्जन स्थळी बोलावले आणि तिचा गैरफायदा घेतला.

पीडितेने याची माहिती पोलिसांना दिली. दोन्ही आरोपींचे वय 65 पेक्षा जास्त असून सध्या ते फरार आहेत. आरोपींची नावे रणछोड भाई सुतार आणि वाजोल भाई सुतार अशी असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. पोलिसांकडे आरोपी पीडितेला ब्लॅकमेल करत असल्याची ऑडिओ क्लिप असून याआधारे ते आरोपींचा शोध घेत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या