
कूपर रुग्णालयामध्ये शौचालयात पडल्यानंतर जखमी झालेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना गेल्याच आठवडयात घडली असताना आता 20 नोव्हेंबर रोजी दाखल करण्यात आलेली एक वृद्धेचा बेडवरून पडल्यानंतर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. रुग्णालय प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच असे प्रकार वाढल्याचा आरोप करण्यात येत आहे. पालिकेच्या कूपर रुग्णालयात 20 नोव्हेंबर रोजी सोनाबाई चव्हाण (80) वर्षीय वृद्धेला दाखल करण्यात आले होते. त्यांना उच्च रक्तदाब आणि मधुमेह असे आजार असल्यामुळेच त्यांच्यावर कूपरमध्ये महिला वैद्यकीय कक्षात उपचार सुरू होते.


























































