
काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल यांनी निवडणूक आयोगावर भाजपचे निवडणूक एजंट म्हणून काम करत असल्याचा आरोप केला आहे. बुधवारी लोकसभेत निवडणूक सुधारणांवर बोलताना वेणुगोपाल यांनी आजच्या डिजिटल युगात मशीन-रीडेबल मतदार याद्या का तयार केल्या जात नाहीत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ते म्हणाले की, मोदी सरकारने निवडणूक आयुक्तांच्या निवडीच्या प्रक्रियेतून सरन्यायाधीशांना काढून टाकण्यासाठी आणि त्यांच्या जागी पंतप्रधानांच्या पसंतीच्या कॅबिनेट मंत्र्याची नियुक्ती करण्यासाठी कायदा आणला.
वेणुगोपाल यांनी निवडणूक आयोग आणि त्यांच्या अधिकाऱ्यांना कोणत्याही कारवाईपासून कायदेशीर संरक्षण देणाऱ्या तरतुदीवरही जोरदार टीका केली. ते म्हणाले की, स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणूक आयोगाची कल्पना आता नष्ट झाली आहे. निवडणूक आयोग उघडपणे राजकीय दबावाला बळी पडत आहे आणि एक-पक्षीय संस्था बनली आहे.

























































