एक्झिट पोलबाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय…जाणून घ्या कधी कळणार अंदाज…

देशात पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांची चर्चा आहे. या राज्यात कोणाचे सरकार बनणार, याबाबत सर्व देशात उत्सुकता आहे. ज्या राज्यात निवडणुका आहेत, त्या सर्व राज्यातील मतदान संपल्यानंतर प्रसारमाध्यमे एक्झिट पोल दाखवू शकतात. मात्र, आता होत असलेल्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे.

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराममध्ये विधानसभा निवडणुका होत आहे. गुरुवारी मतदान संपल्यानंतर नेमके कधी एक्झिट पोल बघायला मिळणार, याची उत्सुकता देशभरात आहे. निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयानुसार एक्झिट पोल प्रसारीत करण्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रसारमाध्यमे मतदान संपल्यानंतर 6.30 वाजेनंतर एक्झिट पोल प्रसारीत करू शकत होते. निवडणूक आयोगाने या वेळेत बदल करत ही वेळ 5.30 अशी केली आहे. त्यामुळे प्रसारमाध्यमे एकतास आधीच एक्झिट पोल प्रसारीत करू शकणार आहेत.