उत्तर प्रदेशसह सहा राज्यांमध्ये SIR ची मुदत वाढवली, निवडणूक आयोगाचा निर्णय

निवडणूक आयोगाने सहा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार यादीच्या विशेष फेर तपासणी (SIR) मोहीम 2026 अंतर्गत दावे आणि आक्षेप सादर करण्याची अंतिम तारीख वाढवली आहे. विविध राज्यांमध्ये प्राप्त झालेल्या अर्जांची संख्या आणि तांत्रिक/प्रशासकीय कारणे लक्षात घेऊन आयोगाने हा निर्णय घेतला आहे, असं बोललं जात आहे.

तामिळनाडू आणि गुजरातमध्ये एसआयआर फॉर्म सादर करण्याची अंतिम तारीख १४ डिसेंबर २०२५ (रविवार) होती, जी आता आयोगाने या दोन्ही राज्यांमध्ये १९ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवली आहे. म्हणजेच या राज्यांमधील नागरिकांना आवश्यक कागदपत्रे तयार करण्यासाठी आणि सादर करण्यासाठी पाच दिवसांचा अतिरिक्त वेळ मिळणार आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि अंदमान आणि निकोबारसाठी अंतिम तारीख १८ डिसेंबर २०२५ वरून २३ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये एसआयआरची अंतिम तारीख २६ डिसेंबर वरून ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे.