लोकसभा निवडणुकीचे बिगुल मार्चच्या पहिल्या आठवड्यात वाजणार?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीची घोषणा मार्चच्या पहिल्या आठवड्यात होण्याची दाट शक्यता आहे. निवडणूक किती टप्प्यांत घ्यायची याची चाचपणी निवडणूक आयोगाकडून सुरू करण्यात आली आहे. सध्याच्या सतराव्या लोकसभेची मुदत 3 जून रोजी संपत आहे. 2014 मध्ये सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा 5 मार्च रोजी झाली होती. 2019 च्या निवडणुकीची घोषणा मार्चच्या पहिल्या आठवड्यात होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

लोकसभेसोबत विधानसभा निवडणुका

  • 2014 मध्ये लोकसभेसोबत आंध्र प्रदेश, ओडिशा, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश विधानसभेच्या निवडणुका घेतल्या होत्या. याही वेळी लोकसभेसोबत या राज्यांतील विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे.
  • जम्मू-कश्मीर विधानसभा बरखास्त असून तेथे राष्ट्रपती राजवट सध्या आहे. सहा महिन्यांच्या आत विधानसभा निवडणुका घ्याव्या लागतात. तेथेही लोकसभेबरोबर विधानसभा निवडणुका होतील असा अंदाज आहे.

निवडणुकीचे टप्पे वाढणार

  • 2004 मध्ये 29 फेब्रुवारीला लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली आणि चार टप्प्यांत निवडणुका घेण्यात आल्या.
  • 2009 ला 2 मार्चला घोषणा होऊन 5 टप्प्यांत मतदान झाले.
  • 2014 ला 5 मार्चला घोषणा झाली आणि 9 टप्प्यांत निवडणुका झाल्या. हे वाढते टप्पे पाहता 2019च्या निवडणुकीतही यात वाढ होण्याची शक्यता आहे.