
गुहागर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे भास्कर जाधव यांनी विजय मिळवला आहे. भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सहदेव बेटकर यांच्यावर 26500 मतांनी विजय मिळवला आहे. भास्कर जाधव यांना 78350 आणि सहदेव बेटकर यांना 51880 मतं मिळाली.
#ElectionResults2019 – विजयी उमेदवारांची नावे वाचा एका क्लिकवर
विधानसभा निवडणुकीपूर्वी घरवापसी केलेल्या भास्कर जाधव यांनी शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवली. 15 वर्षानंतर शिवसेनेमध्ये परत आलेल्या भास्कर जाधव यांनी विजय मिळवला.
गुहागरमध्ये कोणाला किती मतं –
भास्कर जाधव – शिवसेना- 78380
सहदेव बेटकर – राष्ट्रवादी – 51880
विकास जाधव – वंचित आघाडी -5049
गणेश कदम – मनसे – 2516
उमेश पवार – बसप- 2001
नोटा – 2053





























































